अरे सेन्सॉर सेन्सॉर
सेन्सॉर बोर्ड असावा की नसावा इथून खरं तर चर्चेला सुरुवात व्हायला हवी. पण तसं बोलणं म्हणजे कुणाचा तरी हक्क भंग होईल. अलीकडे आपण बघतोय, नेते मंडळी "कंबरे खालचे" या संज्ञेला लाजवतील अशी विधाने करत आहेत. त्यांना कुठलाच सेन्सॉर नाही. माफी मागा विषय संपला. पण एखादा चित्रपट जर काही खरं बोलला असेल तर त्याची मात्र काही खैर नाही. तो सेन्सॉर मधे तर अडकतोच पण नंतर हेच नेते त्या चित्रपटाचे खेळ बंद पाडण्या पासून सगळे उद्योग करतात.
सत्य घटनेवर चित्रपट बनवा, तुम्हाला हमखास सिनेमा सुरु होण्या आधी डिस्क्लेमर द्यायला लावतील- कथा काल्पनिक आहे, सत्य घटनेवर आधारित नाही. हे असंच लिहायचं असेल तर बोंबलायला सत्य घटनेवर सिनेमा बनवायचाच कशाला?
सेन्सॉर असावा की नसावा या प्रश्नाचे उत्तर आम्ही तरी हो असेच देऊ. कारण प्रतिभा स्वातंत्र्याच्या नावाखाली फिरोज खान स्कूल चे...